ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

दैनिक समतापथ : उल्हासनगर


प्रतिनिधी : आबासाहेब साठे 

 सागर,आकाश बेग  यांच्यावर मोकोका (MCOCA)अंतर्गत कारवाई करा  

उल्हासनगर सकल मातंग समाज 

दैनिक समतापथ : उल्हासनगर : दिनांक ७ नोव्हेंबर २०२५


सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजाचे संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हा हल्ला करणारा हल्ले खोरावर पोलिसांनी कारवाई केली त्यावेळेला काही हिंदुत्ववादी संघटनांनी मातंग समाजाच्या विरोधात मोर्चा काढून मातंग समाजाच्या नेत्याला मातंग समाजाला शिवीगाळ केली होती व मातंग समाजाच्या नेत्यांना चेतावनि खोर आवाहन केले होते  याच्या निषेधार्थ  उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र क्रांती लहुजी सेनेचे अध्यक्ष राधाकृष्णा साठे यांच्या नेतृत्वाखाली

सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,  तहसील येथे जोरदार निदर्शने करत सागर बेग व आकाश बेग यांच्यावर मोकोका का अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली व तसे निवेदन उल्हासनगर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आले  या मोर्चात  दीपक सोनोने, ज्ञानेश्वर साठे, रघुनाथ खैरनार, नितीन चांदणे, नवीन साठे, राजू साठे,आबासाहेब साठे, अजय जाधव, शैलेंद्र रुपेकर, परशुराम सुरडकर गंगाधर मानकर,या प्रमुख पदाधिकाऱ्यासमवेश शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते

.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025