दैनिक समतापथ 25/12/2025
दैनिक समतापथ : उल्हासनगर
समाजात वावरताना समाजातील दूर्लक्षित घटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज समाजात वावरणाऱ्या संवेदनशील विचारांच्या लोकांची असते, हौसाई सामाजिक संस्था आपल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजूंना वेळोवेळी योग्य मदत करत असते त्याअनुषंगाने 21 नोव्हेंबर 2025 रोजी बदलापूर येथे(20 )गरीब रिक्षा चालकांना रेशन वाटप करण्यात आले याप्रसंगी समाजासाठी व समाज कार्यासाठी सदैव कार्यरत आहोत असे याप्रसंगी राजू साळवे साहेब यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल अविनाश देवरे यांचे आभार मानून हौसाई सामाजिक संस्था लोकांची मदत करण्यात कायम तत्पर असल्याचे टायटस डोळस यांनी सांगितले
समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो त्यामुळे अशा लोकांची सेवा घडय असते, आमच्या मागे असलेल्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या आशिर्वादाने हे सर्व शक्य होत असून सेवा करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो त्यामुळे लोकांची सेवा घडत असते या प्रसंगी वीस रिक्षा चालक परिवारा सोबत हजर होते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अशी माहिती हाऊसाई सामाजिक संस्था अध्यक्ष आबासाहेब साठे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा