पोस्ट्स

महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी वर लाठीचार्ज

इमेज
  मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींवर लाठीचार्ज २० अटकेत  नागपूर हिवाळी अधिवेशन यशवंत स्टेडियम परिसरात तणावपूर्ण परिस्थिती दैनिक समतापथ : १३ डिसेंबर नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुमारे १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. निवडणुका व आंदोलनाचा पाठपुरावा लक्षात घेऊन हा कार्यकाळ पाच महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र प्रशिक्षण संपल्यानंतर कायम अथवा किमान कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी यापूर्वी नाशिक, सांगलीसह राज्यभरात जवळपास १९ आंदोलने केली. आश्वासने देऊनही कोणताही ठोस शासन निर्ण...

शारदीय नवरात्री निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातृशक्तींचा हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूरतर्फे यथोचित सन्मान

इमेज
  धर्मेशसिंह राजपूत प्रतिनिधी    आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात येतात. त्यापैकीच नवरात्री हा देवीचा उत्सव  संपूर्ण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. ह्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. देवी मातेने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करून महिषासुर नामक राक्षसाचा नाश केला होता म्हणून देवी मातेला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. अशा या शक्तीचा म्हणजेच मातृशक्तीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने भक्तांकडून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला मातृशक्तीचे मोठे योगदान लाभलेले आहे. इतिहासाची पाने उलटली तर महाराणी पद्मावती, राजमाता जिजाऊ मासाहेब,माता रमाबाई आंबेडकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, श्रीमती इंदिरा गांधी व नुकतीच भारताच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदी निवड झाली असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मू हे या मातृशक्तीचे प्रतीक आहे. वेळोवेळी या मातृ शक्तीने आपल्या देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी अविस्मरणीय असे कार्य के...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर