ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

इमेज
  मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार  मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री , लाच या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार. दैनिक समतापथ 14/02/2026

बिकन स्काऊट गाईड ओपन ग्रुप मध्ये संविधान दिवस साजरा

बिकन स्काऊट गाईड ओपन ग्रुप मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला



दिनांक: 30/11/2025


स्थळ: साकीतमा हिंदी मिडीयम हायस्कूल, सुगत नगर, नागपूर.


26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार होते भारतीय संविधान आपल्याला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही महत्त्वाची मूलतत्त्वे देते .नागरिक म्हणून आपण संविधानाच्या आदर करणे आणि एकता जपणे हे आपली जबाबदारी आहे संविधान दिवसाला आज 75 वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या संविधानाच्या अभिमान बाळगू या आणि एक चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्न करूया या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिकन्स स्काऊट गाईड ओपन ग्रुपच्या सेक्रेटरी भीमकला थपके होत्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अध्यक्षांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले हीमायरा खंडवाणी या गाईडने प्रेरणा दायी एक कविता म्हटली . रिची भेईसारे (गाईड )व अरस्तू भेईसारे ( स्काऊट) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला . अध्यक्षां भीमकला थपके यांनी संविधानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची रोकडे इव्हेंट लीडर व आभार प्रदर्शन सौम्य वालदे(स्काऊट) यांनी केले बीकन ग्रुपच्या कोषाध्यक्ष दीपा भैसारे व अलका वराडे उपस्थित होत्या.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाची उद्देशिका वाचून शपथ घेण्यात आली व संविधान दिवस चिराई होवो असे नारे लावण्यात आले. स्काऊट/ गाईड, रोवर /रेंजर ,कब /बुलबुल ,यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरोग्य कर्मचारी चे ९ चे फेब्रु.पासून काम बंद आंदोलन

CPI ELE.2025

बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा