ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

इमेज
  मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार  मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री , लाच या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार. दैनिक समतापथ 14/02/2026

आरोग्य कर्मचारी चे ९ चे फेब्रु.पासून काम बंद आंदोलन

आरोग्य कर्मचारी ९ चे फेब्रु.पासून पगारासाठी काम बंद आंदोलन करणार.

दैनिक समतापथ : प्रतिनिधी नागपूर  : ०४/०२/२०२६
आयुक्त व अभियान संचालक, मुंबई यांना पत्राद्वारे कळविण्यात आले


नागपूर, दि. ४/२/ २०२६:

 राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील (UPHC) कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मासिक मानधन अदा केले जात नसल्याने, ९ फेब्रुवारी २०२६ पासून काम बंद आंदोलन करण्याची सूचना प्रशासनाला

दिनांक  ३० जानेवारी २०२६ रोजी देण्यात आली आहे.


नागपूर महानगरपालिका अस्थायी आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते भाई जम्मू आनंद तसेच सचिव सुश्री अर्चना मंगरुलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्त्यांनी 

डॉ. अश्विनी निकम, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान-नागपूर महानगरपालिका सेल यांच्यामार्फत आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई यांना पत्र पाठविले आहे.


कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर अस्थिर

- गेल्या दीड वर्षापासून मासिक मानधन नियमित वेळेवर मिळत नाही, तर खूप उशिरा मिळते.

- पगाराच्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- घराचे भाडे, घराचे टॅक्स थकबाकी,बँकेचे हप्ते, पाण्याचे बिल, वीज बिल, विमा हप्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इ. सर्व बाबी पूर्णपणे अनियंत्रित झाल्या आहेत.

- रुपयाचे अवमूल्यन आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.


  ✷  संघटनेचे मुख्य आरोप

- कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन नियमित देणे ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे.

- जेव्हा कर्मचारी आपल्या न्याय्य मागणीसाठी संपावर जातात तेव्हा त्यांच्या पगारात कपात होते, पण मेहनत करूनही पगार वेळेवर मिळत नाही तेव्हा नुकसानीची भरपाई मिळत नाही. हे कामगारांना कैद करण्यासारखे आहे.

- उशिरा पगारामुळे कर्मचारी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. व्याजावर पैसे उभे करावे लागतात.

- बचत करणे अशक्य झाले आहे. कुटुंबीयांकडून, मित्रांकडून, नातेवाइकांकडून वारंवार कर्ज मागावे लागते.

- कर्मचाऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.

- सरकार व प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेची काळजी नाही, ही अत्यंत चिंतेची आणि खेदाची बाब आहे.


इतर प्रलंबित मागण्या

जुलै २०२५ पासून लागू झालेली *१५% पगारवाढ* अद्याप दिलेली नाही. तसेच इतर कामांसाठी मिळणारे प्रोत्साहन भत्तेही थकले आहेत. यामध्ये प्रमुखपणे खालील बाबींचा समावेश आहे:


| क्र. | कार्य | रक्कम | स्थिती |

|-----|-----------------------|---------------------------

| 1 | १५ टक्के वेतनवाढ | जुलै २०२५ पासून | लागू झालेली नाही |

| 2 | RI सत्र | ९० रुपये प्रति सत्र | थकलेले |

| 3 | UHND | २२५ रुपये | थकलेले |

| 4 | मोबिलिटी | २२५ रुपये दरमहा | थकलेले |

| 5| आरोग्य वर्धिनी | २००० रुपये दरमहा | २०२४ पासून दिलेले नाही |


   ✷  इतर मुद्दे

- एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नियुक्त केलेल्या लेखापालांना प्रत्येकी दोन केंद्रांचे काम दिले जाते, पण गेल्या ६-७ वर्षांपासून अतिरिक्त कामाचे पैसे दिले जात नाहीत.

- बाह्यस्त्रोतांमधून नियुक्त लेखापालांच्या किमान वेतनातील फरकाची रक्कम महापालिकेने द्यावी, असा शासन निर्णय असूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.


संघटनेचा निर्णय

वरील सर्व प्रलंबित मागण्या व थकबाकीचे पगार, भत्ते नियमित न झाल्यास ९ फेब्रुवारी २०२६ पासून संपूर्ण काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


शिष्टमंडळात जम्मू आनंद,कुंदा बुरडे, नीता वनवे, रंजना नागमोते, ममता नंदनवार, दुर्गा फरकासे, सुवर्णा चौधरी, जयश्री वांदेकर, ज्योत्स्ना, रुपाली राऊत, श्रद्धा कांबळे, दुर्गा कोडापे, प्रीती हटवार, पूजा कठाणे, भाग्यश्री जयश्री, जयश्री वायदा, नीता वनवे, सावलाखे, ऐश्वर्या नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

आंदोलनाची माहिती कामगार नेते जम्मू आनंद अध्यक्ष नागपूर महानगरपालिका अस्थायी आरोग्य कर्मचारी संघटना ने दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा