ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

दैनिक समतापथ

 उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन चे दुर्लक्ष आमरण उपोषण करते महिला ची तबीयत बिघडली

दैनिक समतापथ 

 उल्हासनगर : प्रतिनिधी : अब्बा साहेब साठे 

दिनांक १९/ नोव्हेंबर २०२५



उपोषणकर्ते सौ.राजकुमारी नारा यांची तब्बेत अस्वस्थ..

जिल्हा अध्यक्ष रोहितजी साळवे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण .

उल्हासनगर प्रभाग क्र. जुने २ व ४ मधील आंबेडकरनगर, हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागे, उल्हासनगर ५ या परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासुन मुलभुत सुविधांपासून वंचित आहेत. त्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच महानगरपालिका अधिकारी यांना वारंवार कळवुन सुध्दा सदरील परिसर हा दलित वस्ती व मागास असल्याकारणाने येथील नागरिक समस्यांना दुर्लक्षित केले जात आहे हया समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही आमरण उपोषण करीत आहोत. या समस्या ज्या ज्या नागरिकांना वाटतात की, आपल्या समस्या आहेत, त्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होतेकी, आपण उपोषणास्थळी भेट देवुन आपल्या मागण्यांना पाठीबा देवुन त्या पुर्ण करून व्याव्यात.

सदर उपोषणात १७/११/२०२५ रोजी उल्हासनगर महानगरपालिका च्या गलथान कारभार आणि प्रभाग क्र.१९ आणि २० मधील मूलभूत नागरी सुविधा साठी आमरण उपोषण ला बसलेल्या राजकुमारी नारा यांची तब्बेत अत्यवस्थ झाली आहे....आणि उल्हासनगर पालिका प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करत आहे...नारा यांनी प्रसार माध्यम शी बोलताना स्पष्ट केले की जो पर्यंत उल्हासनगर महानगरपालिका ठोस पाउल उचलत नाही आणि नागरी सुविधा देत नाही तोवर आमरण उपोषण सुरू ठेवले जाईल नागरिकांच्या हक्कासाठी जर इथे मला काहीही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही उल्हासनगर महानगरपालिका ची असेल....तसेच उल्हासनगर शहर अध्यक्ष रोहित साळवे यांनी स्पष्ट केले की कार्यकर्ता आमच्या साठी मोलाचा आहे...पालिका प्रशासन झोपेतून जागे झाले नाही तर उग्र आंदोलन केले जाईल 

-: प्रमुख मागण्या :-


१. आंबेडकरनर, गुड्डु किराणा दुकानाजवळ शौचालय दुरूस्त करणे २. समाज मंदिराचे शौचालयापासुन १०० फुट लांब दुरूस्ती करणे


३. रेणुकामाता मंदिराजवळ पाण्याची पाइप लाईन चॉकअप झाली आहे ती दुरूस्त करून दयावे.


४ . मामा किराणा दुकानाजवळ बाजुला नवीन पाईपलाईनला अदयापपर्यंत पाणी कनेक्शन चालु केलेले नाही ते चालु करणे


५. आरोग्य विभाग, साफसफाई व अन्य समस्या बाबत उपोषण


६. जुनी खड़ी मशीन खदान रोड लालचक्की उल्हासनगर ५ वर पाणी, खड्डे व पुल दुरूस्ती करणे,

७) उल्हासनगर महानगरपालिका मध्ये निवेदन देऊन कुठलीच कार्यवाही होत नाही महानगरपालिका आयुक्त नी कामचुकार करणाऱ्या अधिकारी वर निलंबनाची कारवाही करण्यात यावे.


मा. महादेव सखाराम शेलार उल्हासनगर शहर,

मा. सज्जन बपुराव शेकटे सचिव

उल्हासनगर शहर जिल्हा

सौ. राजकुमारी दौलतराम नाय सचिव

उल्हासनगर शहर जिल्हा

श्री. डॉ जयराम लुल्लाजी (सचिव), श्री. रोहित साळवे, श्रीमती अंजली साळवे (मा. नगरसेविका), श्री. कुलदिप आयलसिंघानी, श्री. जाकिर काझी (समाजसेवक), श्री. किशोर धडके, श्री. अनिल यादव,श्री, रजनीकांत शाह, व इतर काँग्रेस कमिटी सदस्य कार्यकर्त

 उपोषण स्थळी उपस्थित होते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर