मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींवर लाठीचार्ज २० अटकेत नागपूर हिवाळी अधिवेशन यशवंत स्टेडियम परिसरात तणावपूर्ण परिस्थिती दैनिक समतापथ : १३ डिसेंबर नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुमारे १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. निवडणुका व आंदोलनाचा पाठपुरावा लक्षात घेऊन हा कार्यकाळ पाच महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र प्रशिक्षण संपल्यानंतर कायम अथवा किमान कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी यापूर्वी नाशिक, सांगलीसह राज्यभरात जवळपास १९ आंदोलने केली. आश्वासने देऊनही कोणताही ठोस शासन निर्ण...