नागपूर डिस्ट्रिक्ट स्काऊट गाईड फेलोशिप नागपूर मध्ये गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुदत्त बुद्ध विहार ,जागृत नगर नागपूर . दिनांक :30 डिसेंबर 2025 नागपूर डिस्टिक स्काऊट गाईड फेलोशिपच्या वतीने गेट-टु -गेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नागपूर डिस्टिक एसजीएफ चे अध्यक्ष अशोक बोंदाडे सर फेलोशिप सदस्य/सदस्l ज्यांनी वर्षभर कार्यरत राहून म्हणजे 'ॲक्टिव्ह मेंबर 'यांना शील्ड व सर्टिफिकेट देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला त्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन जॉईन सेक्रेटरी श्री सुनीलकुमार गणेर सर यांनी केले तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्री. सुनील गजभिये यांनी केले उपाध्यक्ष सौ.माया बोंदाडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की नवीन वर्षा मध्ये सुद्धा याच जोशाने व नवीन उमंग यांनी सर्व काम करणार आहेत. याप्रसंगी फेलोशिप पदाधिकारी कोषाध्यक्ष सौ.आम्रपाली गणेर,सलाहकार सौ.विमल टेंभुर्णे ,प्रतीक कन्नाके, तसेच इतर सदस्य प्रकाश गजभिये,सतीश बागडे ,सुनील बोरकर ,पृथ्वीराज सोनटक्के ,मोरेश्वर उचितकर ,सुमेध गायकवाड ,राजकम...