दैनिक समतापथ 25/12/2025
तिरपुडे सेंट्रल स्कूलच्या लाइटहाऊस वॉटर पार्कमध्ये चिमुकल्यांची धमाल पिकनिक – पाण्यात भिजली, हसली अन् बुद्धिमत्ता वाढली!
मुलांचे धूमाल काही क्षण...नागपूर/रामटेक, दि. ५ डिसेंबर २०२५
तिरपुडे सेंट्रल स्कूलने नर्सरी ते इयत्ता तिसरीच्या जवळपास ४५० लहान मुलांसाठी रामटेकजवळील लाइटहाऊस वॉटर पार्क अँड रिसॉर्ट येथे एकदिवसीय पिकनिकचे आयोजन केले. पाण्याच्या स्लाइड्स, वेव्ह पूल, मशरूम फवाऱ्यांखाली भिजणे, छोट्या झुल्यांवर “चल मेरे घोडे टिक टिक टिक” म्हणत फिरणे आणि रंगीबेरंगी पोपट-कॉकॅटूना खाऊ घालणे – आजचा दिवस मुलांसाठी खरा जल्लोष ठरला.
मुलांनी पाण्यात उड्या मारल्या, रेन डान्स केला, मित्रांसोबत हातात हात घालून गोल गोल फिरली. प्रत्येक स्लाइडवर चढताना किंवा पाण्यात उतरताना शिक्षक-शिक्षिका मागोमाग सावध नजर ठेवून मदतीला होत्या. कोणतेही मूल एकटे पडू नये म्हणून प्रत्येकीने ८-१० मुले सांभाळली, त्यामुळे पालकांचेही मन शांत होते.
मुख्याध्यापिका डॉ. आफ्रिन एस. सयानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,
“ही पिकनिक फक्त मनोरंजन नव्हते, तर आमच्या लहान मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारी अनमोल संधी होती. नवीन वातावरण, पाण्यातील खेळ, पक्ष्यांना जवळून पाहणे-खाऊ घालणे, मित्रांसोबत सहकार्य – यातून मुलांचा बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि संयम वाढतो. घरी परतताना प्रत्येक मुलगा-मुलगी उत्साहाने म्हणत होता, ‘उद्या लवकर शाळेत जायचंय!’ अशा आनंदी सहलींमुळेच मुले शाळेत येण्यास आणि शिकण्यास इतके प्रोत्साहित राहतात. आम्हा शिक्षकांचेही आज मन बालपणी परतले. लाइटहाऊस टीमचे मनापासून आभार!”
संध्याकाळी सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांत सर्व मुले हसत-खिदळत आणि मनात पिकनिक आठवण
घेऊन सुखरूप शाळेत परतली. पालकांच्या कुशीत जाऊन पिकनिक ची गोष्टी सांगितले
डॉ. आफ्रिन सयानी मैडमच्या नेतृत्वात त्रिपुडे सेंट्रल स्कूलने पुन्हा एकदा दाखवून दिले की, खरे शिक्षण हे फक्त वही-पुस्तकात नव्हे, तर अशा आनंदी व अविस्मरणीय क्षणांत सामावलेले असते!
मुलांचे धूमाल काही क्षण व्हिडिओ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा