ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

कॉ. सुबोध मोरे, रमेश हरळकर यांना पुरस्कार जाहीर

कॉ. सुबोध मोरे. रमेश हरळकर, यांना सत्यशोधक पुरस्कार जाहीर 

मुंबई : दिनांक १ डिसेंबर २०२५ 



२५ वा सत्यशोधक चेतना पुरस्कार २०२५ चे मानकरी 

रमेश हरळकर, कॉ. सुबोध मोरे यांना जाहीर 


सत्यशोधक मनोहर कदम स्मृती जागर तर्फे दिनांक ४ डिसेंबर रोजी २०२५, सायंकाळी ६:३० वाजता आर. एम. भट हायस्कूल सभागृह, कामगार मैदानाजवळ, परळ. येथे संपन्न होणार.

मानकरी ची थोडक्यात कार्य माहिती.



रमेश हरळकर : 

हे एक सामाजिक आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत, जे सफाई कामगारांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी काम करतात. ते 'सफाई कर्मचारी परिवर्तन संघ'चे संस्थापक आहेत आणि 'झाडू विरुद्ध खडू' यांसारख्या अभियानांमधून सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना २००४ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य पुरस्कार मिळाला आहे. 


सुबोध मोरे : हे एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक आणि विचारवंत आहेत. ते जातीअंत संघर्ष समितीचे समन्वयक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या कार्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा आणि पुरोगामी विचारांचा प्रभाव आहे. त्यांना समाज प्रबोधनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यासाठीही ओळखले जाते. 

कार्याचा थोडक्यात आढावा:

सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते: सुबोध मोरे हे डाव्या आणि पुरोगामी वारसा बालपणात तून यांना 

लाभलेला आहे सुबोध मोरे द्विंगत कॉ. खासदार आर.बी. मोरे, ज्यांनी महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन, डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या सोबत धुरा सांभाळली होते तसेच सुबोध मोरे कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सोबत बालपणात अण्णा भाऊ चा साथ लाभलेला आहे , व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा व्हावा यांची धडपड सुरू आहे सोबत अण्णाभाऊ साठे यांच्या वर साहित्य, परिषद मध्ये मार्गदर्शन करीत असतात व अण्णा कॉ.भाऊसाठे यांचे जीवन कार्य बहुजन समाजापुढे. सतत मांडतात , मोरे 

सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतील एक ज्येष्ठ नेते आहेत.

जातीअंत संघर्ष समितीचे समन्वयक: ते 'जातीअंत संघर्ष समिती'चे समन्वयक आहेत, जो आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा घटक आहे.

पुरस्कार आणि सन्मान: त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

गोपाळबाबा वलंगकर जीवन गौरव पुरस्कार: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्यावतीने हा पुरस्कार रमेश शिंदे यांच्यासोबत त्यांना देण्यात आला होता.

गुरुवर्य कृष्णराव केळुसकर पुरस्कार: या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते 

आज परत त्यांना २५ वा सत्यशोधक चेतना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर