ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

इमेज
  मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार  मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री , लाच या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार. दैनिक समतापथ 14/02/2026

" रक्तदान सर्वश्रेष्ठ दान"

 *बिकन्स स्काऊट गाईड ओपन ग्रुप व नागपूर डिस्ट्रिक्ट स्काऊट गाईड फेलोशिप यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर साजरा करण्यात आला*.

नागपूर दिनांक: 1 फरवरी 2026 

      " रक्तदान सर्वश्रेष्ठ दान" या म्हणी लाअनुसरून बिकन स्काऊट गाईड ओपन ग्रुप मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजक स्काऊट गाईड ओपन ग्रुपचे संस्थापक सदस्य सुनील कुमार गणेर हे आहेत .या कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट गाईड प्रार्थननेणे झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्त्रोत बीकन ग्रुपचे ग्रुप लीडर अशोक बोंदाडे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर डिस्टिक फेलोशिपच्या उपाध्यक्ष माया बोंदडे , एचजी एफचे (कार्याध्यक्ष )सुनील गजभिये,(गाईड  ग्रुप लीडर) आम्रपाली गणेर, सहाय्यक ग्रुप लीडर रंजीता गजभिये(एच.डब्लू बी), भीम कला थपके( सचिव ),प्रतिक कन्नाके (सहाय्यक ग्रुप लीडर स्काऊट ), पूज्य ० भंते  , डॉ.सीमा साखरे, साकेतामा शाळेच्या प्राचार्य रूपाली साखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी लाईफ लाईन ब्लड बँक मधून देवयानी सेलूरकर ,निकिता सोलंकी, अनुष्का थूल, सुमित खोब्रागडे ,सचिन आनवने, अश्विन कुमार इ. उपस्थित होते. देवयानी सेलूकर मॅडम यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की रक्तदान कोण करू शकतो .बी.पी, शुगर ,आणखी इतर काही आजार असेल ते रक्तदान करू शकत नाही . सर्वांचे आरोग्य निरोगी असले पाहिजे याकरता हिमोग्लोबिन 11 ते 14 पर्यंत पॉईंट असणे आवश्यक आहे. तसेच रक्तदान करणे चांगले आहे यामुळे गरजू रक्तदात्याला नवीन जीवन मिळू शकते व त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन शिबिराचे उद्घाटन केले.डायरेक्टर डॉक्टर विराज वरंबे यांनी सुद्धा या  शिबिराला भेट दिली व त्यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले रक्तदानामुळे कुणाचे जीव कसे वाचू शकते याबद्दल त्यांनी  उपस्थित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बोंदाडे यांना  त्यांनी शील्ड भेट दिली.तसेच रक्तदान करणाऱ्या सदस्यांना सर्टिफिकेट आणि ब्लड डोनेशन कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील गजभिये यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बोंदाडे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन  मार्गदर्शन केले.फेलोशिप कडून कॉफी /बिस्कीट आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम कला थपके  यांनी केले व आभार प्रदर्शन कोमल मेश्राम यांनी केले एकूण 35 सदस्यांनी रक्तदान केले. आम्रपाली गणेर, प्रतीक कन्नाके,ज्योत्स्ना कुर्वे  राजकमल डोंगरे यांनी रक्तदान केले .येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे  गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. स्काऊट सोम्य वालदे, मिहीर धपके, विकास शाहू ,श्रेयांस जनबंधू,प्रशांत घरडे विशेष करून उपस्थित होते तसेच गाईड मधून रीची भैसारे ,रियांशी मेश्राम, लावण्य ढोले, हीमायरा खंडवानी, स्वरा कोटांगले उपस्थित होते फेलोशिपचे सदस्य कमलजीत जानोरकर,पृथ्वीराज सोनटक्के ,प्रकाश गजभिये ,मोरेश्वर उचितकर, माधुरी सोनटक्के ,अर्चना बागडे ,संध्या मेश्राम इत्यादी उपस्थित होते. (फलॉक लीडर)प्राची रोकडे ,(सहाय्यक सचिव) ज्योत्स्ना कुर्वे,(इव्हेंट लीडर)कोमल मेश्राम, (कोषाध्यक्ष) दीपा भैसारे , गाईड कॅप्टन अलका वराडे ,हर्षिता भिवगडे ,मनीषा शिवणकर  तसेच स्काऊट मास्तर राजकमल डोंगरे प्रतीक कन्नाके यांच्या अथक प्रयत्नाने

रक्तदान शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरोग्य कर्मचारी चे ९ चे फेब्रु.पासून काम बंद आंदोलन

CPI ELE.2025

बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा